Mumbai : तब्बल 500 किलोमीटरचा सायकल प्रवास करून शिवसैनिक शिवाजी पार्कवर

Continues below advertisement

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळावर अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी मूळ शिवसेनेत केलेल्या बंडानंतर, साजरी होणारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची ही पहिलीच जयंती होती. संगमनेरमधून आलेल्या ठाकरे गटाच्या अजिज मोमीन या शिवसैनिकानं आपल्या रक्तानं उद्धव ठाकरेंना संदेश लिहिला होता. 'आखरी सास तक उद्धव ठाकरे साहेब के साथ रहूंगा - मुस्लिम मावळा अजिज मोमीन' असं त्या संदेशात म्हटलं होतं. रामचंद्र गायकवाड हे शिवसैनिक तर परभणीच्या पालममधून सहा दिवसांत तब्बल ५०० किलोमीटरचा सायकल प्रवास करून शिवाजी पार्कवर दाखल झाले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram