ठाण्यातील शिवभवन इमारतीचा काही भाग कोसळला, आजबाजूच्या सहा इमारती पालिकेकडून रिकाम्या
ठाणे : आज ठाण्यातील शिवभवन या जुन्या इमारतीचा आतील काही भाग कोसळला. सकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली. ही बिल्डिंग धोकादायक असल्याने आधीच रिकामी करण्यात आली होती. 30 वर्ष जुनी, चार माळ्याची ही बिल्डिंग आहे. मात्र, ही जर कोसळली तर आजूबाजूच्या बिल्डिंगला धोका होईल म्हणून बाजूच्या 6 बिल्डिंग ठाणे पालिकेने रिकाम्या केल्या आहेत. एकूण 174 कुटुंबांना बाजूच्या अंबिका आणि आदर्श हायस्कूलमध्ये तात्पुरती सोय करून देण्यात आली आहे.