Mumbai : सुकेश चंद्रशेखरमुळे शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूर ईडीच्या रडारवर ABP Majha
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरमुळे शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूर या अभिनेत्री ई़डीच्या रडारवर आहेत. सुकेशकडून महागडं गिफ्ट घेतलेल्या १५ अभिनेत्रींवर ईडीची नजर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेशच्या चौकशीत आणखी नावं समोर आल्य़ाचं कळतंय़. याआधी जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेहीची ईडीकडून चौकशी झाली होती. त्यानंतर आता आणखी अभिनेत्रींची नावं सुकेशच्या चौकशीत समोर आलीत.