Sharmila Thackeray : बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, राज ठाकरेंच्या भाषणावर पत्नीची प्रतिक्रिया
Mahayuti Rally Shivaji Park Mumbai Raj Thackeray : शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत राज ठाकरे यांनी बेधडक भाषण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. त्याशिवाय त्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला. राज ठाकरे यांनी मोदी पुन्हा सत्तेत येतील असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत राज ठाकरे यांनी 'आपण आहात म्हणून राम मंदिर होऊ शकलं', असे म्हटले. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहा बेधडक मागण्या केल्या आहेत. पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीजींसमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या खूप आपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी मोदींकडे कोणत्या सहा मागण्या केल्या आहेत.
1. अनेक वर्षे खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा.
2. जवळपास 125 वर्ष या हिंदभूमीवर मराठा साम्राज्य होतं त्याचा इतिहास देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा.
3. समुद्रामध्ये छत्रपतींचा पुतळा कधी उभा राहिल माहित नाही. पण शिवछत्रपतींची खरी स्मारके आहेत ती म्हणजे गड किल्ले आहेत. गडकिल्ल्यांना गतवैभव मिळावं यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी. भविष्यातील पिढ्यांना आमचा राजा कोण होता.त्यानं काय इतिहास गाजवला हे त्या गडकिल्ल्यावरुन कळेल.
4. देशात अनेक रस्ते तयार केलेत. गेली 18-19 वर्षे मुंबई-गोवा महामार्ग तसाच आहे. तो लवकरात लवकर व्हावा, ही विनंती आहे.
5. बाबासाहेब आंबेडकरांच्या सविंधानांना धक्का लावणार नाही, हे खडसावून सांगा.
6. देशात लाखो, करोडो मुसल्मान आहे, त्यांची देशावर निष्ठा आहे. पण काही मुठभर आहेत, जे काँग्रेस, ठाकरेंना पाठिंबा देणारे आहेत, त्यांचा उदेश फक्त दहा वर्षात डोक वर करता आलं नाही. डोक वर काढण्याचा सुलभ मार्ग कोणता, तर काँग्रेसशिवाय त्यांना मार्ग नाही. त्यामुळे त्यांना पाठिंबा देत आहेत. पण लाखोंच्या संख्येनं मुस्लीम आपल्यासोबत आहे, त्याला शाश्वती हवी, त्याला आदर आहे, त्याला देशामध्ये काम करायचं आहे. नागरिक आहे. तो पिढ्या न पिढ्या राहणार आहे. पण हे मुठभर आहेत, ओवैसीसारख्या औलादी आहेत, त्यांचे जे अड्डे आहेत, ते अड्डे तपासून घ्या.. तिथे माणसं घुसवा. देशाची सैन्य घुसवा आणि त्यांना उध्वस्त करून टाका. म्हणजे देशात सर्वांना सुरक्षित वावरता येईल.
7. मुंबई रेल्वेकडे लक्ष द्यावे, जास्तीत जास्त पैसे द्यावेत.