Mumbai Share Market सुरु होताच सेन्सेक्स 850 अधिक अंकांनी वधारला, सलग दुसऱ्यादिवशी बाजार 'अप'
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात सकारात्मक चित्र दिसून येतंय. आज बाजार सुरू होताच सेन्सेक्सनं ८५० हून अधिक अंकांनी उसळीही घेतलेय. तर निफ्टीदेखिल २४७ अंकांनी वधारलाय. अमेरिकेच्या फेडरल बँकेनं अपेेक्षित व्याजदर वृद्धी न केल्याचे सकारात्मक परिणाम बाजारात दिसून येतायत... कच्या तेलाच्या किमती १०० डॉलर्सच्या आता आल्या आहेत. डॉलर्सच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन थांबून रुपया वधारलाय त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.