Mumbai : शरद पवारांवर टीका, नारायण बंधूविरोधात गुन्हा मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात एफआयआर : ABP Majha

दिशा सॅलियनबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राणे पितापुत्रांवर गुन्हा दाखल असतानाच, आत्ता शरद पवारांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडणाऱ्या राणे बंधूंवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नितेश राणे आणि निलेश राणेंविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलाय.. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झालाय.... दाऊदशी संबंधित मालमत्तेचा व्यवहार केल्याच्या आरोपांनंतर मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केलीय. मात्र अद्याप त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आलेला नाही.. त्यावरुन भाजप नेते शरद पवारांवर टीका करताहेत.. ही टीका करताना राणे बंधूंनी अनेकवेळा शरद पवारांचा संबंध दाऊदशी जोडला होता.. आणि आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola