Sharad Pawar : Garware Club House व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत शरद पवार विकास पॅनलचा पुरता धुव्वा

Continues below advertisement

गरवारे क्लब हाऊस व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत शरद पवार विकास पॅनलचा पुरता धुव्वा उडाला. वास्तविक गरवारे क्लब हाऊसच्या अध्यक्षपदी शरद पवारांची बिनविरोध निवड झाली. पण व्यवस्थापन समितीच्या उर्वरित १२ जागांवर पवारांच्या पॅनेलच्या उमेदवारांचा पराभव झाला. या जागांवर प्रतिस्पर्धी डायनॅमिक पॅनेलचे उमेदवार बहुमतानं निवडून आले. त्यामुळं शरद पवारांच्या गरवारे क्लब हाऊसवरच्या सलग वीस वर्षांच्या वर्चस्वाला पहिल्यांदाच सुरुंग लागल्याचं दिसून आलं. डायनॅमिक पॅनेलचे सायरस गोरिमार भाजप नेते राज पुरोहितांचा धुव्वा उडवून उपाध्यक्षपदी निवडून आले. तसंच डायनॅमिक पॅनेलचे मनीष अजमेरा खजिनदारपदी, तर मोहित चतुर्वेदी व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी सर्वाधिक मतांनी निवडून आले. पवार पॅनेलच्या या पराभवाचं श्रेय सायरस गोरिमार, मनीष अजमेरा आणि मोहित चतुर्वेदी यांना देण्यात येत असलं तरी त्यामागचा पॉलिटिकल ब्रेन कुणाचा आहे, याविषयी राजकीय निरीक्षकांमध्ये चर्चा सुरु आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram