Shakti Mill Gang Rape मधील आरोपी आकाश जाधवला पुन्हा अटक
Continues below advertisement
शक्ती मिलमधल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात केवळ अल्पवयीन म्हणून तुरुंगवासाच्या शिक्षेवर सुटलेल्या आकाश जाधवला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण खात्याच्या पथकानं गंभीर गुन्ह्यासाठी पुन्हा अटक केली आहे. आकाश आणि त्याचा साथीदार अंकित नाईक यांनी रिझवान कुरेशीवर चाकूहल्ला करून, त्याला गंभीररित्या जखमी केलं आहे. याच प्रकरणात आकाश आणि अंकितला अटक करण्यात आली आहे. आकाश जाधवनं शक्ती मिल प्रकरणातून सुटका झाल्यावर आपली टोळी उभारली असून, विविध परिसरात दहशत माजवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्याच्यावर दोन हत्या,जीवे मारण्याची धमकी, गंभीररित्या जखमी करणं, मारहाण करणं, खंडणीवसुली आदी प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Continues below advertisement