Traffic Police विलास शिंदे हत्येप्रकरणी दोषी अहमद कुरेशीला जन्मठेप | ABP Majha

Continues below advertisement
वाहतूक पोलीस विलास शिंदे यांची खार येथे 2016 मध्ये मारहाण करुन हत्या करणारा आरोपी अहमद मोहम्मदअली कुरेशी याला शनिवारी मुंबई सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ नाही, त्यामुळे आरोपी हा फाशीस पात्र नाही. मात्र आरोपीने आपलं कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करून त्याची हत्या केली आहे. त्यामुळे तो कठोर शिक्षेस नक्कीच पात्र आहे. अशा आरोपीवर दया दाखवली तर समाजात चुकीचा संदेश जाईल. असं मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश किशोर जयस्वाल यांनी आपल्या निकालात स्पष्ट केलं. जन्मठेपेसोबत कुरेशीला न्यायालयाने 50 हजारांचा दंडही ठोठावला आहे. ज्यातील 45 हजार रुपयांची रक्कम शहीद विलास शिंदे यांच्या पत्नीला देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्य सरकारने त्यांच्याकडील उपलब्ध अनुकंपा योजनेनुसार शिंदे कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे निर्देशही दिले आहेत. शिंदे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात त्यांची विधवा पत्नी एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. विलास शिंदे यांना राज्य सरकारने शहिदाचा दर्जा दिलेला असून त्यांचा मुलगा दिपेश शिंदे यालाही मुंबई पोलीस दलात नोकरी मिळाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram