Sachin Sawant : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत अटकेत

वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांना ५ जुलैपर्यंत ईडी कोठडी देण्यात आलीये. वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्या घरावर ईडीनं छापेमारी केली . सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन सावंत यांच्या मुंबईतील निवासस्थानावर मंगळवारी छापा टाकण्यात आला. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. काल मध्यरात्रीपर्यंत सावंत यांच्या घरी ईडीचा तपास सुरू होता. ५०० कोटी रुपये बेकायदेशीररित्या वळवल्याच्या एका प्रकरणातील आरोपीनं सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावरून सीबीआयनं एफआयआर दाथल केली. आज त्यांना ईडीने अटक केलीये.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola