ज्येष्ठ विनोदी लेखक, कथाकथनकार द. मा. मिरासदार यांचे निधन ABP Majha

मुंबई : ज्येष्ठ विनोदी लेखक,  कथाकथनकार द. मा. मिरासदार यांचे वयाच्या 95 वर्षी  वृद्धापकाळाने निधन झाले आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

दत्तात्रय मोराती मिरासदार हे मराठी साहित्य विश्वात द. मा. या नावाने परिचित होते.  विनोदी लिखाणाबरोबरच तेवढ्याच खुमासदार शैलीत कथाकथन करण्यातही त्यांचा हातखंडा होता.  शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्यासह मराठा कथाकथन सर्वत्र लोकप्रिय केलं.  परराज्य आणि परदेशातही द.मांच्या कथाकथनाचे कार्यक्रम झाले.

द. मा.  मिरासदार यांना साहित्य अकादमी पुरस्काराबरोबरच महाराष्ट्र राज्याचा वाङ्मयीन पुरस्कारही मिळाला होता. त्याचबरोबर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. 

द. मा.  मिरासदार यांचा जन्म 14 एप्रिल, 1927 मध्ये झाला होता. त्यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले. पुण्यात आल्यावर ते एम.ए. झाले. काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी इ. स. 1952 साली अध्यापन क्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅम्प एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. 1961 मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola