Senate Election : सिनेट निवडणूक स्थगित झाल्याने राजकारण तापलं, स्थगितीची झळ कुणाला?
Continues below advertisement
मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक गुरुवारी संध्याकाळी स्थगित केल्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. कारण ज्याचा सिनेटवर ताबा असतो त्यांना विद्यापीठविषयी अनेक अधिकार मिळतात. इतकंच नाही तर नव्या मतदारांना म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्या बाजूनं वळवण्याचीही राजकीय पक्षांना ही संधी मिळते. म्हणून सिनेट निवडणूक प्रत्येक राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची असते. आता ही निवडणूक स्थगित झाल्यामुळे ठाकरे गटासह, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, छात्र भारती आक्रमक झालीय. वास्तविक सिनेटसाठी 10 सप्टेंबर रोजी मतदान होणार होतं आणि 13 सप्टेंबरला निकाल जाहीर होणार होता. पण सिनेट निवडणुकीच्या अंतिम मतदारयादीत मतदारांच्या नावांमध्ये तफावत आणि अनेक नावे डबल झाल्यामुळे या निवडणुकीला स्थगिती देण्यात आलीय.
Continues below advertisement