Saraswati Pujan at NCP Office : राष्ट्रवादी विधिमंडळ पक्ष कार्यालयात सरस्वती पूजन ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Oct 2022 12:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या सरस्वतीबाबत केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झाल्यानंतर आज राष्ट्रवादी विधिमंडळ पक्ष कार्यालयात सरस्वती पूजन करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता सरस्वती पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. शाळेत सरस्वतीपेक्षा महापुरुषांचे फोटो लावायला हवेत, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. त्यानंतर भाजपनं भुजबळ यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ कार्यालयात होणाऱ्या सरस्वती पूजनाला वेगळं महत्त्व आहे.