Sanjay Raut: बाळासाहेब ठाकरेंना, वीर सावरकरांना पुरस्कार का नाही?- राऊत ABP Majha

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त काँग्रेस नेत्यांनी ट्विट न केल्यानं फडणवीसांनी शिवसेनेवर लाचारीचा ठपका लावला होता. त्याची परतफेड करण्यासाठी संजय राऊतांनी पद्म पुरस्करांच्या मुद्द्याला हात घातला. भाजपनं बाळासाहेब ठाकरेंना पद्म पुरस्कार का दिला नाही असा प्रश्न संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे. तसंच मरणोत्तर पद्मपुरस्कार पद्धतीला आक्षेप घेताना, आतापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुरस्कार का दिला नाही असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहुयात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola