Sanjay Raut vs Sanjay Nirupam : हिंदुत्व , विश्वासघात आणि साधुंमध्ये 'सामना'
Sanjay Raut vs Sanjay Nirupam : हिंदुत्व , विश्वासघात आणि साधुंमध्ये 'सामना' शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठाला सोहळ्याला विरोध केला होता. राम मंदिर पूर्ण झाले नसताना प्राणप्रतिष्ठा करत आहेत, असा आरोप शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर केला होता. आता हेच अविमुक्तेश्वरनंद (Shankaracharya) पुन्हा एकदा चर्चेत आलेत आहेत. याला कारण त्यांनी मातोश्रीवर जात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांची भेट घेतली. त्यांनी नुसती भेटच घेतली नाही तर त्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगलीय. उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही, शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांचे हे विधान सध्या चर्चेत आहे. मातोश्रीवर आलेल्या शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांचे मातोश्रीवर आदरातिथ्य उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केलं. यावेळी आदित्य आणि तेजस ठाकरेही होते. मात्र त्यांच्या या आदरातिथ्यानंतर सर्वाधिक चर्चा रंगली ती शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांनी केलेल्या विधानाची... मागील चार साडेचार वर्षापासून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडत विश्वासघात केला, अशी टीका भाजपच्या प्रत्येक नेत्याकडून केली जाते. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं खुद्द अविमुक्तेश्वरनंद महाराज उभे राहिलेत. उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या विश्वासघातामुळे आम्हाला दु:ख झाले आहे. उद्धव ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसलेले पाहायचे आहे. जोपर्यंत तुम्ही पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत आमच्या हृदयातील वेदना कमी होणार नाही. त्यांच्या विश्वासघाताने आम्ही दु:खी आहोत, असे विधान स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी केले. जो विश्वासघात करतो तो हिंदू असू शकत नाही असे विधानही त्यांनी केलेय.