Sanjay Raut on BJP Leader : भाजप नेत्याचा बारमध्ये गोंधळ, संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
Sanjay Raut on BJP Leader : भाजप नेत्याचा बारमध्ये गोंधळ, संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एका भाजपा नेत्याबाबत मोठा दावा केलाय. दोन दिवसांपूर्वी पहाटे उशिरापर्यंत बारमध्ये दारू पिणारा भाजप नेता बारमध्ये पोलिसांशी हुज्जत घालत होता. दरम्यान फडणवीस त्यांना पाठीशी घालतायत का? असा सवला राऊतांनी केलाय. याप्रकरणी गृहमंत्री आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.