Sanjay Raut : संजय राऊतांची तुरुंगात नवी ओळख, कैदी नंबर 8 हजार 959
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या लेखणीने विरोधकांवर निशाणा साधणारे नेते म्हणजे संजय राऊत.... आपल्या रोखठोक लिखाणातून राऊतांनी शिवसेनेची बाजू खंबीरपणे मांडली..विरोधकांचा कोणताही वार झाला की राऊत आपल्या लेखणीने विरोधकांचा खरपूस समाचार घेतात... पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर आर्थर रोड कारागृहातही संजय राऊत यांची लेखणी तळपतेय... संजय राऊत कारागृहात काय करतात याची एक्स्क्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती लागलीय... संजय राऊतांचा कैदी नंबर ८ हजार ९५९ असा आहे. सुरक्षेच्या कारणास्तव राऊत यांना आर्थर रोड कारागृहातील स्वतंत्र बराकीत ठेवण्यात आलंय. कारागृहातील ग्रंथालयात वाचन करण्यात ते व्यस्त असल्याची माहिती मिळतेय.. तसंच टीव्हीवरील बातम्यांच्या माध्यमातून बाहेरच्या जगात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींबाबत ते स्वतःला अपडेट ठेवत असल्याची माहिती मिळालीय.. राऊत पत्रकार असल्याने आणि लिहिण्याची सवय असल्याने तुरुंग प्रशासनाने त्यांना वही, पेन आणि इतर साहित्य पुरवलं. त्यामुळे कारागृहात राऊतांचा बराच वेळ लिखाणात जात असल्याची माहिती माझाला मिळालीय....