Sanjay Raut Full PC Mumbai : व्यापाऱ्यांना मालामाल करण्यासाठी गुजरातच्या कांदा निर्यातीचा निर्णय

Sanjay Raut Full PC Mumbai : "व्यापाऱ्यांना मालामाल करण्यासाठी गुजरातच्या कांदा निर्यातीचा निर्णय"

देशभरात कांदा निर्यात बंदी असतानाच केंद्रानं गुजरातमधून तब्बल २ हजार मेट्रीक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला मंजूर दिलीय. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. एकीकडे राज्यातील कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्याचं नुकसान होतंय. तर दुसरीकडे गुजरातमधील कांदा हा नवी मुंबईच्या न्हावा-शेवा बंदरातून निर्यात करण्यास परवानगी देण्यात आलीय.. नाशिक, पुणे, जळगाव, अहमदनगर परिसरातील शेतकऱ्यांनी याविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय. त्यामुळे आतातरी निवडणुकीच्या प्रचारात दंग असलेले राजकीय नेते कांदा निर्यात बंदीचा प्रश्न दिल्लीदरबारी मांडणार का, आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना न्याय मिळणार का, असा सवाल शेतकरी आणि व्यापारी करतायेत. त्यावरुन संजय राऊतांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola