भाजपच्या दु:खात मी सहभागी; पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरील अँजिओप्लास्टी यशस्वी झाली असून त्यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. "माझी तब्येत ठणठणीत आहे. चार दिवस उपचार केले. हृदयाचा त्रास आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने, लिलावती रुग्णालयातील डॉक्टर यांच्यामुळे मी आता बरा आहे. दोन दिवस विश्रांती घेऊन कामाला लागेन, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावेळी दिली. सोबतच राजकीय पथ्ये थोडीफार पाळू, असंही ते म्हणाले.

संजय राऊत यांच्यावर एक वर्षापूर्वी लिलावती रुग्णालयातच अँजिओप्लास्टी झाली होती. परंतु त्रास वाढू लागल्याने पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी ते मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावरील अँजिओप्लास्टी यशस्वी झाल्यानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

भाजपच्या दु:खात मी सहभागी आहे. आम्हाला नक्की आनंद आहे. निवडणुकीत विजय पराभव होत असतो. भाजपचे पदवीधर मतदारसंघाचे बालेकिल्ले ढासळले. महाराष्ट्रातील वारं समजातील सर्व स्तरात बदलल्याचं दिसतं. महाविकास आघाडीला जनतेचा पाठिंबा नाही असं बोलणाऱ्यांनी या निवडणुकीतल्या मतांकडे पाहावं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola