Sanjay Raut | कंगनासोबत व्यक्तिगत भांडण नाही, पण मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणं गंभीर : संजय राऊत
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच संजय राऊत यांनी याप्रकरणी पुन्हा एकदा आपलं मत व्यक्त केलं आहे. कंगना रनौतसोबत माझं व्यक्तीगत भांडण नाहीये, पण मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणण्याचं कृत्य, हे अत्यंत गंभीर आहे, असं संजय राऊत म्हणाले.