Sanjay Raut Full Speech : मोदीजी आप तो गयो! महाराष्ट्राशी पंगा महागात पडणार : संजय राऊत
Sanjay Raut on BJP, Mumbai Meeting : "कार्यवाहक पंतप्रधान किंवा चार जूननंतर भूतपूर्व होणाऱ्या पंतप्रधानांची आज मुंबईत सभा आहे. मागील काही दिवसापासून त्यांचा मुक्काम महाराष्ट्रमध्येच आहे. रस्त्यावर आणि गल्लोगल्ली फिरतायत, मोदीजी लक्षात घ्या आम्ही तुम्हाला आताच रस्त्यावर आणलं आहे. तुमचा आवडता झोला घेऊन आता हिमालयात जावं लागेल. त्याची व्यवस्था महाराष्ट्रचं करणार आहे. महाराष्ट्राशी पंगा घेतलाय आता सोडणार नाही. मोठा भाई, छोटा भाई, गांडा भाई कुठलाच भाई आता चार जून नंतर राहणार नाही " असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी संजय राऊत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.