Sanjay Raut Full PC : हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि बाळासाहेबांच्या स्मारकारवर या : संजय राऊत Mumbai

Continues below advertisement

Sanjay Raut PC : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन प्रत्येकानं घ्यावं, पण जो व्यक्ती तिथे नतमस्तक होतोय, त्यानं चांगल्या मनानं तिथे जावं, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. दरम्यान, आज शिंदे गट शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांच्या स्मृतिंना अभिवादन करणार आहेत. यावर माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच, हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि स्मारकावर या, असं आवाहनही शिंदे गटाला राऊतांनी केलं आहे.

देश हादरवणाऱ्या श्रद्धा हत्याकांडावरही (Shraddha Murder Case) संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. मारेकऱ्यांवर खटले न चालवता, भरचौकात फासावर लटकवा, असं म्हणत संजय राऊतांनी या प्रकरणावर कोणीही राजकारण करु नये, असंही म्हटलं आहे. 

ठाकरे गटाचे (Thackeray) खासदार संजय राऊत म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मगच स्मारकाला हात जोडायला जा. खंजीर बाजूला ठेवा आणि मग बाळासाहेबांना नमस्कार करायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला जा. बाळासाहेब सगळं पाहतायत, काय सुरु आहे आणि काय होणार आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत लोक खंजीर खुपसतायत. त्यांचं कधीच भलं झालेलं नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन प्रत्येकानं घ्यावं, पण जो व्यक्ती तिथे नतमस्तक होतोय, त्यानं चांगल्या मनानं तिथे जावं."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram