Sanjay Raut Full PC on Udayanraje Bhosale : उदयनराजेंच्या अश्रूंनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केली

Continues below advertisement

Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांना प्रतापगडावर  जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याचा अधिकार नसल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) धिक्कार करणं गरजेचं होतं. मात्र, ते तोंड शिवून गप्प बसल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, राज्य सरकारकडून शिवप्रताप दिन साजरा करणं हे ढोंग असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला. उदयनराजे यांचे अश्रू आम्ही पाहिले आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. उदयनराजेंचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू आहेत. त्यांनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केल्याचे राऊत म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram