Sanjay Raut Full:बाळासाहेबांच्या विचारांची मशाल निष्ठावंतांच्याच हातात Balasaheb Thackeray Smrutidin
Continues below advertisement
Sanjay Raut : सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या, ही शिवसेनेची मागणी असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. गेल्या 15 वर्षापासून आम्ही ही मागणी करत आहोत. पण त्यांना भारतरत्न का दिला जात नाही? असा सवालही राऊतांनी सरकारला केला. सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावामागे आपोआपच पदव्या लागलेल्या असतात असेही ते म्हणाले. सावरकर हे हिदुह्दयसम्राट होते, त्यांच्यानंतर बाळासाहेब हेच हिदुह्दयसम्राट असल्याचे राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी तुम्हाला इतकेच प्रेम असेल तर त्यांना देखील भारतरत्न द्यावा, असेही राऊत म्हणाले. या पदव्या दिल्यामुळं सावरकर किंवा बाळासाहेब मोठे होणार नाहीत, तर पदव्या मोठ्या होतील असेही राऊत म्हणाले.
Continues below advertisement
Tags :
Balasaheb Thackeray Mumbai Sanjay Raut Shiv Sena CM Eknath Shinde : Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Smrutidin