Uday Samant Attack : शिवसैनिकांवर खोट्या गुन्ह्यांचा आरोप,शिवसेनेचे नेते पोलीस महासंचालकांना भेटणार
पुण्यात आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. या प्रकरणी शिवसेनेचं शिष्टमंडळ आज राज्याच्या
पोलीस महासंचालकांची भेट घेणार आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, उपनेत्या निलम गोऱ्हे, सचिन अहिर आणि वरुण सरदेसाई पोलीस महासंचालकांना भेटणार आहेत.