Sanjay Raut ED : 1 खासदार, 2 आमदारांना संजय राऊतांच्या भेटीची परवानगी नाकारली
Continues below advertisement
ईडीनं अटक केल्यानंतर आर्थर रोड तुरुंगात असलेले खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी गेलेल्या दोन आमदार आणि एका खासदाराला तुरुंग प्रशासनानं भेटीची परवानगी नाकारली. न्यायालयानं आदेश किंवा परवानगी दिली तरच संजय राऊत यांना भेटता येऊ शकेल असं अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. आज खासदार आणि दोन आमदारांनी तुरुंग अधिकाऱ्यांकडे राऊत यांच्या भेटीची परवानगी मागितली होती. तुरुंग प्रशासनाच्या नियमावलीनुसार केवळ रक्ताच्या नात्यातील कुटुंबीयच अभ्यागतांच्या खोलीत आरोपींना भेटू शकतात. त्यामुळे राऊत यांचे भाऊ आणि कुटुंबातील सदस्यांनाच भेटण्याची परवानगी दिली जाईल.
Continues below advertisement