Mumbai Police : पोलिसांच्या तक्रारींसाठी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा अनोखा उपक्रम, जाणून घ्या..

राज्यभरातल्या पोलिसांसाठी चांगली बातमी आहे. कारण त्यांना त्यांच्या तक्रारी थेट पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडेच मांडता येणार आहेत.  संजय पांडे यांनी त्यासाठी टेलीग्राम चॅनल सुरू केलंय. या माध्यमातून दर रविवारी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत पांडे स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकणार आहेत. आतापर्यंत पोलिसांना नोकरशाहीच्या चौकटीतूनच आपलं म्हणणं वरिष्ठापर्यंत पोहचवता येत होतं. पण आता टेलीग्राम चॅनेलद्वारे ते थेट पोलीस महासंचालकांशी संपर्क साधू शकतात आणि त्यांच्याशी संवाद साधू शकतात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola