Sandeep Patil application for MCA Election : संदीप पाटील यांचा MCAसाठी उमेदवारीचा अर्ज वैध
Continues below advertisement
माजी कसोटीवीर संदीप पाटील यांचा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतला अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. एमसीएच्या त्रैवार्षिक निवडणुकीच्या अधिकाऱ्यांनी पाटलांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे. त्यामुळं त्यांचा एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एमसीएच्या निवड समितीचे अध्यक्ष सलिल अंकोला हे पाटील यांचे व्याही आहेत. त्यामुळं त्यांच्यावर हितसंबंधांचा आरोप करून एमसीएचे विद्यमान सचिव संजय नाईक यांनी पाटील यांच्या निवडणूक अर्जाला हरकत घेतली होती. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी ती हरकत फेटाळून पाटील यांचा अर्ज अध्यक्षपदासाठी वैध ठरवला आहे.
Continues below advertisement