Sandeep Deshpande : Raj Thackeray यांच्यावर कारवाईचं कारण म्हणजे उद्याचं आंदोलन: संदीप देशपांडे
Continues below advertisement
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेला अटी शर्तींसह परवानगी दिली होती. मात्र या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादच्या सभेत त्यांनी मशिदींसमोरील भोंगा हटवला नाही तर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. त्यासाठी 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता.
Continues below advertisement