Sandeep Deshpande : Raj Thackeray यांच्या पत्रामुळे घेतलेला भाजपचा निर्णय चांगलाच : संदीप देशपांडे
Continues below advertisement
Andheri East Bypoll: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने (Announce Withdraw Candidate From Andheri East Bypoll) केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबतची घोषणा केली. भाजप उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपकडून याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर आज बैठकीनंतर भाजप उमेदवार मुरजी पटेल हे माघार घेणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी इतर उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement