Samna on Rahul Gandhi : सावरकरांच्या सामनातून राहुल गांधींना कानपिचक्या
सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा उद्घधव ठाकरेंनी काँग्रेसला दिला.. त्यापाठोपाठ आता सामनामधील अग्रलेखातूनही राहुल गांधींना कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. वीर सावरकर हे त्यांच्या जागी थोर आहेत. सावरकरांना अकारण 'माफीवीर' वगैरे दूषणे लावून लढण्याचे बळ कुणाला मिळणार नाही. 'वीर सावरकर' या नावात तेज आहे असं या अग्रलेखात लिहिलं आहे. वीर सावरकर, त्यांचे बंधू बाबाराव सावरकर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने राष्ट्रासाठी महान त्याग केला. त्या महान त्यागाची अवहेलना कुणालाच करता येणार नाही, अशा शब्दांत राहुल गांधींची कानउघाडणी करण्यात आली आहे. राहुल गांधी वीर सावरकरांविषयी जी मानहानीकारक वक्तव्ये करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीस ओहोटी लागेल. महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांची तर सर्वात जास्त अडचण झाल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशाराच शिवसेनेनं काँग्रेसला दिला आहे.