समीर वानखेडेंचं कुटुंब मुस्लीमच, वानखेडेंच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉ. जाहिद कुरेशी 'माझा'वर

Continues below advertisement

Aryan Khan Drugs Case : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात वसुली केल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. यावरुन सध्या चर्चांना उधाण आलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरीही रंगल्या आहेत. अशातच समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नी डॉक्टर शबाना कुरेशी यांचे वडिल डॉक्टर जाहिद कुरेशी यांनी एबीपी न्यूजसोबत खास बातचित केली. त्यावेळी ते म्हणाले की, हे लग्न अरेंजमॅरेज होतं, लव्ह मॅरेज नव्हतं. लग्नापूर्वी तीन-चार वर्ष अगोदर आम्ही एकमेकांना ओळखत होतो आणि हे देखील माहीत होतं की, ते कुटुंब मुस्लिम आहे. ते म्हणाले की, ते आमच्याकडे मुस्लिम बनून आले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram