Sam Dsouza EXCLUSIVE : किरण गोसावी फ्रॉड, त्यानेच समीर वानखेडेंच्या नावाने डील केली : सॅम डिसूझा
मुंबई : किरण गोसावी हा फ्रॉड माणूस असून आर्यन खान प्रकरणात त्याने समीर वानखेडेंच्या नावाने डील केली, त्याने प्रभाकर साईलचा नंबर समीर वानखेडेंच्या नावाने सेव्ह केला आणि आपल्याला मध्यस्ती करण्याची विनंती केल्याचा गंभीर आरोप सॅम डिसूझा याने केला. सॅम डिसूझाने एबीपी माझाशी बोलताना हा गौप्यस्फोट केला.
मी फक्त मध्यस्ताचं काम केलं, या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असं सॅम डिसूझाने सांगितलं. आर्यन खान प्रकरणात साईल प्रभाकर यांनी सॅम डिसूझावर पैशाची डील केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता स्वत: सॅम डिसूझाने यावर खुलासा केला.