Salon Reopen : मुंबईत अडीच महिन्यांनंतर सलूनची दुकाने सुरू, दुपारी चार वाजेपर्यंत सलूनला परवानगी
महाराष्ट्रात आजपासून काही नियम शिथील झाले आहेत. मुंबई लेव्हल-3 मध्ये येत असल्यानं दुकाने आणि सलून देखील खुली झाली आहे. दुपारी चार वाजेपर्यंत ही सर्व दुकाने सुरू राहणार आहे. तब्बल अडीच महिन्यांनंतर ग्राहकांच्या डोक्याला कात्री लागत असल्याने त्यांच्या डोक्याला खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला आहे. सलून मालकांनी देखील अडीच-तीन महिन्यांनंतर हातात कात्री घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.