Sada Sarvankar Revolver Confiscated :पोलिसांकडून सदा सरवणकरांची पिस्तुल जप्त, फॉरेन्सिक तपसाणी होणार
abp majha web team
Updated at:
13 Sep 2022 05:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे गट आणि शिंदे गटातील वादाच्या केंद्रस्थानी असलेले आमदार सदा सरवणकर, यांचं पिस्तुल पोलिसांनी जप्त केलंय. वादाच्या दिवशी सदा सरवणकरांनी याच पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप होतोय. तसंच पोलिसांनी घटनास्थळावरुन एक पुंगळी देखील जप्त केल्याचं समजतंय. दरम्यान पोलिसांनी सदा सरवणकर आणि त्यांचे पुत्र समाधान यांना चौकशीसाठी समन्स बजावलंय. तसंच सदा सरवणकर यांच्या पिस्तुलाची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे. त्यामुळं पिस्तुल आणि पुंगळी सदा सरवणकर यांना अडचणीत आणणार का हे पाहावं लागेल..