Shiv Sena Vidhansabha Office : विधानसभा सभापतींना कल्पना देऊनच कार्यालय ताब्यात : Sada Sarvankar

Continues below advertisement

Shiv Sena Party Office : विधानभवनातील शिवसेना (Shiv Sena) पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने (Shinde Group) घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयानंतर शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं. त्यानंतर आज शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला. याआधी ठाकरे गटाचा या कार्यलयावर ताबा होता. इथे असलेले बोर्ड आणि बॅनर हटवण्यात आले. त्यानंतर भरत गोगावले यांनी आमदारांसह या कार्यालयावर ताबा घेत म्हटलं की आता शिवसेना हा आमचा पक्ष आहे. यापुढे इतर कार्यलयं ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram