Sachin Tendulkar: फोटोचा गैरवापर झाल्याने सचिन संतापला, कायदेशीर कारवाईचा सचिनचा इशारा ABP Majha

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन ९ वर्षे झालीत. तरीही मास्टर ब्लास्टरची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली नाही. आजही बड्या कंपन्या सचिनसोबत करार करण्यासाठी धडपडत असतात. मात्र आता एक नवं प्रकरण समोर आलंय. सोशल मीडियावर सचिन तेंडुलकरचे काही फोटो व्हायरल झालेत. यांत सचिन एका कॅसिनोची जाहिरात करत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र आपल्या फोटोचा गैरवापर करण्यात आल्याची माहिती खुद्द सचिननं दिलीय. सोशल मीडियावर एका कॅसिनोनं आपला फोटो वापरुन केलेल्या जाहिरातीशी संबंध नसल्याचं सचिननं स्पष्ट केलंय. तसंच या कॅसिनोविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सचिनने म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola