S. Sreesanth: लिलावासाठी श्रीशांतची मूळ किंमत 50 लाख, श्रीशांत IPL खेळणार? ABP Majha
वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतनं आयपीएलच्या आगामी लिलावासाठी नावनोंदणी केली आहे. त्यासाठी श्रीशांची मूळ किंमत ५० लाख रुपये इतकी ठरवण्यात आली आहे. २०१३ साली आयपीएलमधल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे श्रीशांतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. पण त्यानंतर बीसीसीआयनं त्याची शिक्षा कमी करुन सात वर्ष केली. त्यानंतर २०२०-२१ या मोसमात मुश्ताक अली स्पर्धेतून श्रीशांतनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. केरळकडून खेळणाऱ्या श्रीशांतनं नुकत्याच झालेल्या विजय हजारे करंडकातही सहा डावात १३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे दहा फ्रँचायझीपैकी श्रीशांतवर कोण बोली लावणार याची उत्सुकता आहे.