Rutuja Lakte on Andheri By Election : ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंची उमेदवारी लटकणार?
abp majha web team
Updated at:
12 Oct 2022 06:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेच्या दोन्ही गटांत शहकाटशहाचं राजकारण सुरु असताना त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास आणखी १५ दिवसांपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. एबीपी माझाला ही एक्स्क्लुझिव्ह माहिती मिळाली आहे. राजीनामा स्वीकारण्यास तांत्रिक अडचण असल्यानं लटके यांच्या उमेदवारीबाबत ठाकरे गटासमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्ल्क असताना राजीनामा स्वीकारला गेला नसल्यानं लटकेंची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे.