Rickshaw Taxi Fare :आजपासून मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ, रिक्षासाठी 23रु, टॅक्सीसाठी 28रु.
आता बातमी आहे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी.... आजपासून मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. राज्य सरकार आणि रिक्षा टॅक्सी युनियनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. . सरकारने दिलेल्या मंजुरीनुसार, रिक्षासाठी आता २३ रुपये तर टॅक्सीसाठी २८ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी युनियनने संप मागे घेतल्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी अडचण थांबली असली तरी मुंबईकरांचा प्रवास मात्र महागला आहे.