TRP Scam | रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक; मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई

Continues below advertisement

टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणी (TRP Scam Case) रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. याआधीही टीआरपी घोटाळ्यासंबंधी पोलिसांनी विकास खानचंदानी यांची चौकशी केली होती. दरम्यान, आतापर्यंत टीआरपी घोटाळ्यात एकूण 13 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांची सुरुवातीला चौकशी करण्यात आली होती. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी विकास खानचंदानी यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. त्यावेळी मात्र विकास खानचंदानी चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर ते क्राईम ब्रांचसमोर चौकशीसाठी हजर राहिले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram