Old Versova Bridge : जुना वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात, तीन दिवस एक लेन जड वाहतुकीसाठी बंद
Continues below advertisement
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदरजवळील वर्सोवा येथील जुन्या खाडी पूलाच्या दुरुस्तीचं काम आजपासून सुरु झालं आहे. शनिवारी 13 नोव्हेंबर पासून सोमवार 15 नोव्हेंबरपर्यंत मुंबई हून गुजरात कडे जाणा-या एक लेन जड-अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे. यावेळी ठाणे मुंबई येथून पालघर गुजरात कडे जाणारी जड अवजड वाहने ही पर्यायी मार्गावरुन वाहतुक करण्यास परवानगी देण्यात आली आहेत. तर हलकी वाहने ही जुन्या पुलाच्या एका मार्गीकेकडून चालू राहतील. यादरम्यान आता प्रचंड वाहतुक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे.
Continues below advertisement