BMC Commissioner Bungalow | मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्याची वस्तूस्थिती काय आहे?

Continues below advertisement

आयुक्तांच्या बंगल्याची सध्या नेमकी काय अवस्था आहे?  बंगल्याची दुरुस्ती करणं गरजेचं झालंय का? या प्रश्नांची खरी उत्तरं शोधण्यासाठी एबीपी माझाची टीम थेट आयुक्त बंगल्यावर पोहोचली. मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात गळकं छत, जमिनीवर ठिकठिकाणी गळणा-या पाण्यासाठी बादल्या, तर, शयनगृहाचीही दूरवस्था झाल्याचं आढळलं, याबाबत आयुक्तांनी आपले स्पष्टीकरण जारी केले. आयुक्त बंगल्याची दुरुस्ती  आणि संवर्धनाची प्रशासकीय प्रक्रिया सन 2019 मध्येच सुरु करण्यात आली होती. हे लक्षात घेता, स्पष्ट होते की, कोविड 19 संसर्गाच्या काळात महानगरपालिका प्रशासन उधळपट्टी करत असल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असं त्यांनी म्हटलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram