Ravi Mhatre:उद्धव ठाकरेंच्या जवळच्या वर्तुळातील व्यक्ती बदलली, ठाकरेंचा 'नवा भिडू' रवी म्हात्रे कोण?
शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले अनेक मुद्दे आणि मेळाव्याला जमलेली गर्दी याची चर्चा सर्वत्र आहे. दसरा मेळाव्याचा ट्रेलर म्हणून सगळे या गर्दीबाबत चर्चा करत आहेत. पण या मेळाव्यात अजून एक विषय म्हणजेच एक व्यक्ती चर्चेत आहे. ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या अवतीभोवती हातात फाईल घेतलेले रवी म्हात्रे बऱ्याच वर्षांनी दिसले.