Ratan Tata : उद्योगपती रतन टाटांची नॅनोमधून सैर, नॉनमधून थेट हॉटेल ताजमध्ये दाखल
Continues below advertisement
ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. रतन टाटांच्या नम्रता आणि साधेपणाचे किस्से आपण वेळोवेळी ऐकत असतो. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे दिग्गज उद्योगपती एका छोट्या कार नॅनोमध्ये कोणत्याही बॉडीगार्डशिवाय बसले आहेत.या व्हिडिओमध्ये रतन टाटा कोणत्याही बॉडीगार्डशिवाय छोट्या कारमधून प्रवास करताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. एकीकडं सामान्य माणसालाही स्वतःसाठी महागडी आणि आलिशान कार घ्यायची आहे, तर दुसरीकडं कोट्यवधी रुपये असलेले रतन टाटा नॅनोमधून फिरताना दिसत आहेत. सोशल मीडियावर रतन टाटांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.
Continues below advertisement