Jitendra Awhad on Rashmi Shukla | रश्मी शुक्ला भाजपसाठी काम करतात; त्या भाजपच्या एजंट : जितेंद्र आव्हाड
मुंबई : परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अखेरीस महाविकास आघडी आक्रमक झाली आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यात खळबळजनक माहिती समोर येण्याचं सत्र सुरु आहे. काल कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आज पुन्हा ट्वीट करत शुक्लांवर आरोप केले आहेत. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा माध्यामांशी संवाद साधताना याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "मी स्वतः राजेंद्र येड्रावरकरांशी बोललो. त्यांनी मला सगळी परिस्थिती सांगितली. त्यांच्या मागे पोलीस ऑफीसर लावण्यात आला होता. रश्मी शुक्ला यांनी 'मेरे साथ चाय पिओगे, तो नमक हरामी नही होगी' असं त्यांना म्हटलं होतं." रश्मी शुक्ला यांच्यासंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले की, "या सरकारला दिलदार राहणं महागात पडलं. रश्मी शुक्ला यांनी रडून माझ्या पतीचं आताच निधन झालय असं म्हणून माफी मागितली होती. मग आमच्या सरकारला पाझर फुटला. रश्मी शुक्ला यांनी पाया पडत माफी मागितली आणि त्यांनी दिलेलं लेखी पत्र परत मागितलं. बरं झालं सरकारने ते पत्र परत नाही दिलं. आता कळतंय हा कटाचा भाग होता. रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या" तसेच विरोधकांकडून सातत्यानं केल्या जाणाऱ्या मागणीसंदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "आम्ही शपथ घेतल्यानंतर 36व्या तासांनंतर राष्ट्रपती राजवट लागू होणार असं बोललं जाऊ लागलं. त्यात काही नवं नाही."