Ranjit Savarkar on Rahul Gandhi : सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांना अटक करा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झालाय. या प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर राहुल गांधी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करणार आहेत. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार करण्यापूर्वी त्यांनी आज राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. सत्तेच्या खेळात राहुल गांधी महापुरुषांचा अपमान करतायत, अशी टीका रणजीत सावरकर यांनी केलीय. राहुल गांधी यांच्याबरोबरच रणजीत सावरकर यांनी ठाकरे गटावरही निशाणा साधला.