Mahadev App प्रकरणी अभिनता Ranbir Kapoor ला ईडीचं समन्स, 6 तारखेला चौकशी

महादेव गेमिंग अॅप चौकशी प्रकरणात अभिनतेा रणबीर कपूरला ईड़ीनं समन्स बजावलं आहे. 
येत्या ६ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीनं दिले आहेत. महादेव समूहाचे ४ ते ५ अॅप्स आहेत. हे अॅप्स दररोज सुमारे २०० कोटींचा नफा कमवतात, अशी माहिती ईडीला मिळाली आहे. 
रणबीरनं मिळवलेलं मानधन हे गुन्ह्यातून आलेल्या पैशांमधून त्याला देण्यात आलं होेतं, तसंच रणबीरनं ही मोठी रक्कम रोख स्वरुपात स्वीकारली, असा ईडीचा संशय आहे. महादेव गेमिंग अॅपचे संस्थापक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्यावर ईडीनं मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादनांशी ज्या सेलिब्रिटींचा संबंध आहे, त्या सर्वांची एक-एक करून चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे १२ ए-लिस्टर सेलिब्रिटींची यादीच ईडीनं तयार केल्याचं समजतंय. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola