Ramesh Kere Patil : रमेश केरे पाटील पोलिसांच्या ताब्यात; गिरगाव चौपाटीवर रोखलं
Ramesh Kere Patil : रमेश केरे पाटील पोलिसांच्या ताब्यात; गिरगाव चौपाटीवर रोखलं
हेही वाचा :
बांगलादेशात (Bangladesh News) सध्या प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. आरक्षणाबाबतचं आंदोलन चिघळलं, त्यानंतर सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं. पुढे आंदोलन एवढं चिघळलं की, शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनामा देऊन काही वेळातच शेख हसीना यांनी देश सोडून पलायन केलं. सध्या शेख हसीना कुठे आहेत? त्यांना कुणी आश्रय दिलाय? याबाबत कोणाला, काहीच माहिती नाही. बांगलादेशात आरक्षणावरून झालेल्या हिंसाचार आणि विरोधानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. सरकार पडल्यानंतर हसीना भारतात आल्या. मात्र, त्यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला आहे. जोपर्यंत हसीना यांना ब्रिटनमध्ये आश्रय मिळत नाही, तोपर्यंत शेख हसीना भारतातच राहणार आहेत. सोमवारी त्यांचं सरकार पडल्यानंतर भारत सरकारनं त्यांना अंतरिम स्थलांतराची परवानगी दिली आहे. मात्र, अशा संकटातून वाचण्यासाठी शेख हसीना भारतात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला होता. कुटुंबाच्या हत्येनंतर बचावलेल्या शेख हसीना भारतात आश्रयाला शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान पदावरुन पायउतार झाल्या, त्यांनी भारताकडे मदत मागितली आणि भारतानं मदत देऊ केलीही. पण यापूर्वीही संकटकाळी भारत शेख हसीना यांच्या मदतीसाठी पुढे आला होता. यापूर्वी 1975 मध्ये शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीनं भारतात आश्रय घेतला होता. त्यानंतर त्या तब्बल 6 वर्षे दिल्लीत राहिल्या होत्या. 15 ऑगस्ट 1975 रोजी शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची त्यांच्या घरी हत्या करण्यात आली. त्या दिवशी शेख हसीना यांच्या कुटुंबातील 17 जणांची हत्या करण्यात आली होती. मात्र, शेख हसीना आणि त्यांची बहीण त्यावेळी जर्मनीत असल्यानं त्यांचा जीव वाचला होता.