Ram Kadam on Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांविरोधात आमदार राम कदम तक्रार दाखल करणार

Continues below advertisement

Mumbai Ghatkopar News : मुंबई : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिरात (Ram Mandir) रामललाचा प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड  (Jitendra Awhad)  यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम (Shri Ram) मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली. आता जितेंद्र आव्हाडांना प्रभू श्रीरामाबाबतचं वक्तव्य भोवणार असंच दिसत आहे. जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाली असून आमदार राम कदम (Ram Kadam) तक्रार दाखल करणार आहेत. तसेच, घाटकोपरमध्ये घाटकोपरमध्ये भाजपचं आंदोलनही सुरू आहेत. याशिवाय मुंबई, पुणे आणि नाशकातही आंदोलन सुरू आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram